प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या विळख्यातून पुणेकरांची सुटका करण्यासाठी शाश्वत आणि ठोस नियोजन करण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक १२ (ड) छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी व्यक्त केला आहे. डेक्कन परिसरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी बुधवारी पदयात्रेला धडाक्यात प्रारंभ केला. या वेळी मतदारांशी संवाद साधताना डाॅ. एकबोटे म्हणाल्या, की शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांपासून ते नगररचना विभागापर्यंत सर्वांमध्ये समन्वय साधून, महापालिकेत ‘स्वतंत्र वाहतूक समिती’ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करेन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली भुयारी मार्गांची संकल्पना आणि मेट्रोचे विस्तारलेले जाळे यामुळे शहरातील वाहतुकीला मोठी गती मिळेल. केवळ रस्तेच नव्हे, तर ‘सायकल ट्रॅक’ची पुनर्रचना करून पुण्याला पुन्हा एकदा ‘सायकलचे शहर’ म्हणून ओळख मिळवून दिली जाईल. मॉडेल कॉलनी, ब्ल्यू बर्ड सोसायटी, जैन बोर्डिंग, गणेशखिंड रस्ता परिसर आणि पुलाची वाडी परिसरातील विविध सोसायट्यांना सकाळी त्यांनी भेटी दिल्या. या वेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. या पदयात्रेत माजी नगरसेविका डॉ. ज्योस्त्ना एकबोटे, नीलिमा खाडे, सुजाता शिरोळे, अपर्णा कुऱ्हाडे , अर्चना सोनवणे, प्राजक्ता डांगे, अनिता शहाणे, राम दिघे, अनिकेत लोखंडे, सुजित गोटेकर, विराज पवार, आकाश कामठे, आदित्य वणगे, धीरज काळे, अर्चना सोनावणे, समर्थ दिघे, पियुष गांजेकर आदी उपस्थित होते.