प्रभात वृत्तसेवा पुणे : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदार होणार असून त्यानंतर लगेच १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी केंद्राची अखेर महापालिकेने घोषणा केली आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय नियोजन केले असून संबंधित प्रभागांतील क्रीडा संकुले, शाळा, महाविद्यालये तसेच सांस्कृतिक केंद्रांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. मतदानानंतर सर्व मतपेट्या मतमोजणीच्या ठिकाणी उभारलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. महापालिकेचे उपायुक्त अरविंद माळी यांनी ही माहिती दिली. मतमोजणी केंद्रे • बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय सारसबाग येथील बाबूराव सणस मैदानावरील कबड्डी मैदान • सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय वडगाव येथील शरदचंद्र पवार अकॅडमी ऑफ ई-लर्निंग • कसबा–विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल • धनकवडी–सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातील पत्रा शेड • घोले रस्ता–शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाचे मैदान • कोंढवा–येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय कात्रज–कोंढवा रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज ई-लर्निंग स्कूल • वानवडी–रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय वानवडी येथील एसआरपीएफ क्रमांक एकमधील जिजाऊ मंगल कार्यालय • हडपसर–मुंढवा क्षेत्रीय कार्यालय रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयातील कर्मवीर सभागृह • येरवडा–कळस–धानोरी क्षेत्रीय कार्यालय : खराडी येथील राजाराम पठारे स्टेडियम • औंध–बाणेर क्षेत्रीय कार्यालय : बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल • कोथरूड–बावधन क्षेत्रीय कार्यालय : कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठ • भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय : रामोशी गेट पोलिस चौकीजवळील रफी अहमद किडवई माध्यमिक महाविद्यालय • वारजे–कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय : पौड फाटा येथील पं. दीनदयाळ उपाध्याय शाळा • ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय : कोरेगाव पार्क येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक • नगर रस्ता–वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय : क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारातच