प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभागात २४ तास पाणी, वीजपुरवठा, स्वच्छ-सुंदर-अतिक्रमणमुक्त रस्ते, पदपथ, सोसायट्यांचा विकास, ज्येष्ठ नागरिक, मुलांसाठी उद्याने, विरंगुळा केंद्रासह प्रभाग १० च्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पदयात्रा, दुचाकी रॅलीने प्रचाराची सांगता केली. या वेळी तरुणांसह नागरिकांकडून मिळालेल्या पाठिंब्यांमुळे ही विजयी रॅली असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. बावधन-भुसारी काॅलनी प्रभाग १० मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजीत राजेंद्र दगडे पाटील, जयश्री गजानन मारणे, सुजाता सूर्यकांत भुंडे, शंकर दत्तात्रय केमसे यांच्या प्रचारार्थ शास्त्रीनगर, सागर काॅलनी, गादीया इस्टेटसह वस्ती भागात पदयात्रा, तर भुसारी काॅलनी, बावधन बुद्रुक आणि खुर्द परिसरात दुचाकी रॅली काढून प्रचाराचा समारोप झाला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करताना अजित पवार आमच्यासारख्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहिले. आता आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहोत, असा ठाम विश्वास दिला. शंकर केमसे यांच्यामुळे प्रभागात पाण्याची गंगा वाहू लागली. सुसज्ज रस्ते, पदपथ झाले आणि वाहतुक कोंडी सुटली. सुजाता व सूर्यकांत भुंडे आणि अभिजीत दगडे यांच्या तत्परतेमुळे बावधन येथील गावकऱ्यांसह सोसायटीतील समस्यांचे तात्काळ निराकारण झाले. सुविधासंपन्न वस्त्यांसाठी जयश्री मारणे यांचे काम आहे. मागील पाच वर्षात मंदावलेल्या विकासाला गती देण्यासाठी राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, , असा विश्वास नागरिकांनी या वेळी दिला.