प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग क्रमांक २३ (ड) मध्ये भाजपने उच्चशिक्षित उमेदवार ॠतुजा गडाळे यांना संधी दिली आहे. भाजपच्या या उमेदवार निवडीचे मतदारांकडून स्वागत होत असून, ही उमेदवारी प्रभागात गेमचेंजर ठरणार आहे. या प्रभागात ॠतुजा गडाळे यांच्यासमोर आंदेकर कुटुंबातील सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली असली, तरी उच्चशिक्षित चेहरा आणि पक्ष संघटनेत सक्रीय असलेले पती तेजस गडाळे यांची प्रभागातील संघटनात्मक बांधणी आणि जनसंपर्काच्या बळावर ॠतुजा गडाळे या प्रभागात गेमचेंजर ठरणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, गडाळे यांच्या प्रचाराची सांगता मंगळवारी झाली. गेल्या १२ दिवसांपासून प्रभाग पिंजून काढला असून, पदयात्रा, घरभेटींवर भर दिला. या कालावधीत प्रभागातील महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच त्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे गडाळे यांनी सांगितले.याशिवाय, प्रभागात सुरक्षितता, स्वच्छता,दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा या बाबींवर विशेष भर देणार असून, महिलांसाठी सुरक्षित वातावरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याने मतदारांनी संधी देण्याचे आवाहनही गडाळे यांनी केले. त्याला प्रतिसाद देत मतदारांकडून सुशिक्षित चेहऱ्याला संधी देण्यासाठी सकारात्मकता दर्शविल्याचे त्या म्हणाल्या.