प्रभात वृत्तसेवा पुणे – फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण, ठिकठिकाणी औक्षणासाठी लाडक्या बहिणींनी केलेली गर्दी, अशा वातावरणात प्रभाग १० मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराची सांगता दुचाकी रॅलीने झाली. या वेळी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी भाजपला साथ द्या, असे आवाहन उमेदवारांनी केले. बावधन-भुसारी काॅलनी प्रभाग १० मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील, अल्पना गणेश वरपे, रूपाली सचिन पवार, दिलीप वेडेपाटील यांच्या प्रचारार्थ प्रभागात दुचाकी रॅली काढण्यात आली. शिंदे पेट्रोल पंप येथून सुरू झालेली रॅली एनडीए पाषाण रोडने एलएमडी चौक, पेबल्स अर्बेनिया सोसायटी, बावधन बुद्रुक गावठाण, बावधन खर्द गावठाण, डीएसके, रानवारा रोड, बांदल इस्टेट, रियाण इंटरनॅशनल स्कुल, एसएनबीपी स्कूल, चांदणी चौक, लोहिया जैन आयटी पार्क, संयुक्त भसारी कॉलनी मित्र मंडळ, न्य इंडिया स्कूल, ओंकार मित्रमंडळ, इंदिरा शंकर नगरी, आशिष गार्डन चौक, कुमार परिसर, महात्मा सोसायटी, जिजाई गार्डन, भुजबळ टाउनशिप, एकलव्य कॉलेज चौक, भारतीनगर, शृंगेरी मठ, क्रांती मित्रमंडळमार्गे आल्यावर बांदल धनकुडे प्लाझा परिसरात रॅलीचा समारोप झाला.बावधनचा पाणीप्रश्न सोडविणार, प्रशासकीय काळात अपूर्ण कामे पूर्ण करणे, नवीन प्रकल्प आणून तरुणांना रोजगाराच्या संधी देणे, वस्त्यांच्या विकासाबरोबरच पुढील ५० वर्षांचा विचार करून प्रभागाच्या विकासाचे व्रत हाती घेतल्याचे उमेदवारांनी सांगितले.