PMC Election: विकसित पुणे शहराचा रोड मॅप असलेलं संकल्पपत्र गुरुवारी (दि.८) सकाळी प्रकाशित झाले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला अन् त्याचे पडसाद बिबवेवाडी शंकर महाराज मठ प्रभाग क्रमांक २० मध्ये उमटले. पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र यशवंत शिळीमकर, तन्वी प्रशांत दिवेकर, मानसी मनोज देशपांडे, महेंद्र माणिकचंद (मुथ्था) सुंदेचा यांच्या वतीने बिबवेवाडी परिसरात दिपक उर्फ बाबा शेठ मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पदयात्रेत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. प्रत्येक घरातून, प्रत्येक गल्लीतून नागरिकांनी मनापासून दिलेला प्रतिसाद या पदयात्रेचं वैशिष्ट्य ठरले. भाजपा उमेदवारांची पदयात्रा बिबवेवाडीत घरोघरी व विकासाची वारी दारोदारी जात होती, यावेळी मतदारांकडून हसतमुख स्वागत, संवादासाठी दाखवलेली आपुलकी आणि औक्षण करताना “आमचा विश्वास तुमच्यावर आहे” ही भावना नागरिकांच्या शब्दांतून आणि डोळ्यांतून स्पष्टपणे दिसत होती. थेट संवादाच्या माध्यमातून जनतेशी असलेलं नातं या निमित्ताने अधिक दृढ झालं. लोकांशी तयार झालेला आपलेपणा, विश्वास आणि विकासाचा ठाम संकल्प याच बळावर बिबवेवाडी शंकर महाराज मठ, गंगाधाम परिसरातील प्रत्येक घरापर्यंत प्रगतीचा संदेश आणि भारतीय जनता पार्टीचे विकसित पुण्यासाठीचे संकल्पपत्र, पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दिलीप मिसाळ, पिनाकी मिसाळ, सदा चव्हाण, राहूल अग्रवाल, विजय अल्हाट, विनोद दुगड, साईराज दुगड, अनिल भन्साळी, रोहन देशपांडे, धर्मेश नहार, संदिप भंडारी तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.