PMC Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मधील औंध बोपोडी प्रभागातील उमेदवार भक्ती अजित गायकवाड यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या प्रचार फेरीदरम्यान त्यांनी औंध बोपोडी मधील विविध भागांत घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. या प्रचार फेरीत स्थानिक रहिवाशांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छता, उद्यानांची देखभाल तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांबाबत आपले प्रश्न आणि अपेक्षा मांडल्या. नागरिकांच्या या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत, सर्वसमावेशक विकास आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्धार भक्ती यांनी व्यक्त केला. “औंध बोपोडी परिसराचा सर्वांगीण विकास करताना पारदर्शक कारभार, वेळेत कामे आणि नागरिकांचा सहभाग हे माझे प्रमुख ध्येय आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा आणि आपुलकी पाहता परिसरात त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस बळ मिळत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रचार फेरीदरम्यान स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद हा आगामी निवडणुकीत परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.