प्रभात वृत्तसेवा पुणे – काँग्रेस पक्षाचा विजय असो, येऊन येऊन येणार कोण, पंजाशिवाय आहेच कोण, अशा घोषणांनी संपूर्ण मतदारसंघ मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रभाग २२ मधील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार इंदिरा अविनाश बागवे,अविनाश बागवे, रफीक शेख व दिलशाद शेख या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सांगता रॅली आयोजित केली होती. या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांसह महिला व युवक सहभागी झाले होते. प्रचाराचा शेवटच्या दिवशी माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली चुडामण तालीम येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यापुढे पूना कॉलेज, हरकानगर, काशेवाडी, लोहियानगर सेव्हन लव्ह चौकातून पुढे डायस प्लॉट येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये माजी मंत्री रमेश बागवे, जुनेब बागवे, जुबेरबाबू शेख, यासेर बागवे,चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, मुन्नाभाई शेख, रोपभाई शेख, आरीफ शेख, विठ्ठल थोरात, दयानंद अडागळे, शफीक शेख, मारुती कसबे, सुरेखा खंडागळे व इतर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्रपक्षाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.