प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेचा प्रभाग क्रमांक १२ हा भविष्यात शहराच्या विकासाचा मानबिंदू ठरेल. या प्रभागातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व सोयीसुविधांनी सज्ज असे आरोग्य भवन उभारण्यास माझे प्राधान्य असेल, अशी ग्वाही भारतीय जनता पक्ष-आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्षाच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी दिली.प्रभाग क्र. १२ ‘ड’ (छत्रपती शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी) मधील प्रचाराचा शुभारंभ आज डॉ. एकबोटे यांनी भारतमातेच्या प्रतिमेस वंदन करून केला. या वेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयाला भेट देऊन पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभागातील सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.प्रचारादरम्यान डॉ. एकबोटे यांनी शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, भैय्यावाडी आणि शिवाजीनगर पोलीस वसाहत परिसरात मतदारांशी थेट संवाद साधला. स्थानिक नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत करत विविध समस्या मांडल्या. या वेळी डॉ. एकबोटे म्हणाल्या, की माझ्या मातोश्री आणि माजी नगरसेविका डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केलेला विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. निवडून आल्यानंतर या भागातील प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.या पदयात्रेत मिलिंद एकबोटे, शैलेश बडदे, दीपक पाटील, राजेंद्र परदेशी, गणेश बनकर, गुरू कोळी, विजय आल्हाट, राजेश कोळी, नरेश कोळी, सागर चलवादी, इब्राहिम इराणी, चंदू म्हेत्रे, महेश गायकवाड , कल्पेश मोरे, सुरज जोशी, विशाल अहिवळे, विलास लाड, प्रकाश साबळे,गणेश बगाडे यांच्यासह भाजप व मित्रपक्षांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.