प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपचे कमळ शहरात फुलवत भाजपला संधी दिली आहे. समाविष्ट गावांतील नवीन प्रभाग असलेल्या 33 मध्ये चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे उमेदवार संदीप मते यांना अवघ्या 100 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यांना भाजपचे उमेदवार सुभाष नाणेकर यांनी मात दिली. तर त्याच प्रभागात भाजपच्या धनश्री कोल्हे या विजयी झाल्या आहेत. तसेच, राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे उमेदवार अनिता इंगळे आणि काका चव्हाण विजयी झाले आहेत. तर भाजपचे उमेदवार किशोर पोकळे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तर राष्ट्रवादीकडून रश्मी घुले यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.नवीन प्रभाग असलेल्या खडकवासला प्रभाग 33 (ड) मध्ये राष्ट्रवादी (श.प.) चे उमेदवार काका चव्हाण यांना 67430 मते पडली. त्यानंतर राष्ट्रवादी (श.प.) च्या उमेदवार अनिता इंगळे यांना प्रभाग 33 (ब) मध्ये 67429 मते पडली. भाजपचे धनश्री कोल्हे यांनी प्रभाग 33 अ मध्ये 32685 मते घेत विजय प्राप्त केला. तर प्रभाग 33 क मध्ये भाजपचे सुभाष नाणेकर यांनी 67426 मतांनी विजय प्राप्त केला. या प्रभागात मोठ्या प्रमाणात महिलांचे होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाले. तसेच, मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक स्पर्धा कार्यक्रम, महिलांसाठी पैठणी कार्यक्रम झाले. तसेच, काही उमेदवारांनी मोठ्या यात्राद्वांरे महिलांना तीर्थस्थळांचे दर्शन घडवले, असे असताना भाजप आणि तुतारी यांच्या मोठ्या चुऱशीच्या लढाईत भाजपचे 2 तर राष्ट्रवादी तुतारीचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. सर्वात चर्चेची अन् चुरशीची ठरली संदीप मते-सुभाष नाणेकर लढत खडकवासला प्रभाग क्र. ३३ मधे अनेक वर्षे मनपा निवडणुकीचे तयारी करणारे संदीप पाटील बुवा मते निवडणूक रिंगणात उतरले. प्रभागांमध्ये होर्डिंग बॅनर, तीर्थयात्रा, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’, विविध सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले होते.प्रभागरचना आणि निवडणुकीच्या वाऱ्याचा अंदाज घेत त्यांनी शिवसेना (उबाठा) मधून काका चव्हाणसारख्या मातब्बर-ज्येष्ठ नेत्याच्या पॅनलमध्ये उडी घेत राष्ट्रवादीची तुतारी हातात घेतली. समोर होते भाजपचे भूमिपुत्र सुभाष नाणेकर यामुळे लढत चुरशीची होणार होती याचे वेध लागले होते, त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. जाणकारांचा अंदाजानुसार, मते आरामात निवडून येणार असे होते. परंतु, अत्यंत चुरशीच्या लढतीत, मतमोजणीच्या दिवशी चित्र पालटलं आणि अवघ्या ५३९ मतांनी विजयाचा फलक निसटला. निकाल जाहीर होताच समर्थकांनी हळहळ व्यक्त केली. या लढतीची मोठी चर्चा झाली. इतकी तयारी असूनही? असा प्रश्न अनेकांच्या ओठांवर दिसत होता.