प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे शहरामध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी ४२ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रभाग क्रमांक १२, छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनीसह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.भाजपच्या प्रचाराची सांगता सभा गोखलेनगर येथे पार पडली. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहराला एक नवी दृष्टी (व्हिजन) देणाऱ्या तरुण उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. भाजप- आरपीआय (आठवले गट) मित्रपक्षांच्या प्रभाग क्रमांक १२ (ड) च्या नगरसेविका पदाच्या उमेदवार प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांची उच्चविद्याविभूषित म्हणून ओळख आहे. या प्रभागात चारपैकी तीनही महिला उमेदवार दिल्याने महिला नेतृत्व सक्षम करण्यासाठी पक्षाने प्रयत्न केले आहेत. डॉ. एकबोटे यांच्याकडे काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असून, यांच्या ज्ञानाचा उपयोग संपूर्ण पुणे शहराला होईल.नागरिकांनी ‘स्मार्ट उमेदवाराचा स्मार्ट प्रभाग, अशी ओळख प्रभाग क्रमांक १२ ला मिळेल, असा विश्वास विजय बहिरट, ऍड. बाबासाहेब चव्हाण, विश्राम वैद्य, शामला देसाई, कॅप्टन चंद्रशेखर चितळे, विकास आचलकर, विलास राठोड, विनोद जैन, डॉ. अविनाश वाचासुंदर, सुरेंद्रगांधी, अनघा घैसास, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. वैशाली बिनीवाले, डॉ. संपत पुंगलिया, नि.कर्नल उपेंद्र मिसाळ, सतीश चितळे, दिलीप घुले, नितीन मोरे, शाम हर्षे, दत्तात्रय खंडागळे, अजय सांवत, संदीप पवार, धनंजय क्षीरसागर यांनी व्यक्त केला. आमदार शिरोळे व डाॅ. एकबोटेंचे आवाहन आपल्या उमेदवारांना सामाजिक कार्याचा वारसा आहे. त्यामुळे सुजाण नागरिकांनी भाजपला मतदान करावे, असे आवाहन आमदार सिद्धार्थ शिरोळे व माजी नगरसेविका डॉ. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांनी केले.