Sangeeta Tiwari | राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र यादरम्यान पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या माजी महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी आपल्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या विधानसभा निवडणुकीपासून संगीता तिवारी पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पक्षांतर्गत काही निर्णयांबाबत त्यांनी आपली असहमती दर्शवली होती. अखेर या त्यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा फटका मानला जात आहे. Sangeeta Tiwari | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेशाची शक्यता काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर संगीता तिवारी आता कोणती नवी वाट निवडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समोर आलेलया माहितीनुसार, त्या लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्या ‘घड्याळ’ हाती घेऊन आपल्या पुढील राजकीय प्रवासाला सुरुवात करतील, अशी चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, संगीता तिवारी या पुण्यातील काँग्रेसचा एक महत्त्वाचा चेहरा मानल्या जात होत्या. महिला काँग्रेसमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. Sangeeta Tiwari | हेही वाचा: Pune : वन्यजीव सर्वेक्षणादरम्यान पुणे वनविभागात ‘शेकरू’चे दर्शन; जंगलाच्या समृद्धीचा महत्त्वपूर्ण संकेत