Pune Bar Association: शहरातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ॲड. काळुराम ऊर्फ राम भुजबळ यांनी निर्विवाद वर्चस्व राखत विजय मिळविला. त्यांनी ३ हजार ८०७ मते मिळवित 597 मतांनी विजय मिळवला. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातल झालेल्या निवडणुकीत सुमारे सात हजार पाचशे वकिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. बॅलेट पेपरवर मतदान असल्याने गुरूवारी दुपारी (दि. 5) एकपर्यंत मतमोजणीचा सुरू होती. उपाध्यक्ष पदाच्या सर्वसाधारण गटाच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत ॲड. कांताराम नप्ते हे ३ हजार ६१९ मते, तर ॲड. प्रतापराव मोरे हे 2 हजार ७०६ मते घेऊन विजयी झाले. तर महिला राखीव गटातून ॲड. प्रितीसिंह परदेशी यांनी ३ हजार ४७ मते मिळवित विजय संपादन केला. Todays Top 10 News: अजित दादांचा ‘तो’ अखेरचा व्हिडिओ समोर ते सोने 70 हजारांपर्यंत घसरणार?… वाचा आजच्या टाॅप बातम्या सर्वसाधारण गटातील सचिव पदाच्या दोन जागेतून ॲड. सम्राट जांभुळकर आणि ॲड. अभिजीत पोळ हे विजयी झाले. त्यांना अनुक्रमे ४ हजार २७२ आणि ३ हजार ३४४ मते मिळाली. महिला राखीव गटातून ॲड. पूजा पवार यांनी ३ हजार ८७६ मते मिळवित विजय मिळविला. खजिनदारपदासाठी झालेल्या लढतीत ॲड. अंजली बांदल यांनी निर्विवाद वर्चस्व राखत विजय मिळविला. त्यांना ५ हजार २७४ मते मिळाली. हिशोब तपासणीस पदाच्या सर्वसाधारण गटातील लढतीत ॲड. शिवराज निंबाळकर ५ हजार २९० मते मिळवीत विजयी झाले. तर महिला गटातून ॲड. नेहा जांभळे यांनी ४ हजार ४ मते मिळवित निर्विवाद वर्चस्व राखले. तर, कार्यकारिणी सदस्यांची यापूर्वी सर्वानुमती निवड झाली आहे. सर्वसाधारण गटातून मयुर मराठे, विकास जाधव, उमेश मांजरे, प्रितेश दळवी, योगेश जैन, अनिल हुडे, अमोल वडगणे, उदय शेलार प्रज्वल गुंजाळ आणि आकाश भिलारे यांची निवड झाली आहे. तर, महिला राखीव गटातून संध्या रायबोले, शितल देशमुख, गुंजन भोसले, स्मिता वाघमारे आणि प्रियंका घाडगे यांची यापुर्वीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. प्रताप परदेशी यांनी काम पाहिले. Ladki Bahin Yojana: हप्ते रखडलेल्या लाडक्या बहिणींना एकत्रित 4500 रुपये मिळणार; उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा