प्रभात वृत्तसेवा विंझर – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकरीसाठी वेल्हे-राजगड तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. वेल्हे येथील ‘हिल टॉप रिसॉर्ट’ मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांची बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही पक्षांची युती जाहीर केली. इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. प्रमुख उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या प्रमुख उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बैठकीस वंचित बहुजन आघाडी व आरपीआयचे दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा निरीक्षक उत्तम वनशिव, जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे, जिल्हा प्रवक्ते महेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष महादेव खाटपे, सुनील कांबळे, सरचिटणीस अरुण कांबळे, रामभाऊ मरगळे, रामभाऊ इंगळे यांचा समावेश होता. वेल्हे तालुकाध्यक्ष बापू शिंदे (वंचित), कुंदन गंगावणे (तालुकाध्यक्ष आरपीआय), आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉ. विश्वनाथ गायकवाड, विलास गायकवाड, विठ्ठल गायकवाड, अमित शिंदे, संतोष गायकवाड, सुरेशदादा गायकवाड, सुजल शिंदे, अमीर शेख (उपाध्यक्ष), सुरेश रणखांबे, अंकुश गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, बाजीराव रणखांबे, विझरचे उपसरपंच संतोष गायकवाड, कार्यकर्ते उपस्थित होते.”तालुक्यातील वंचित आणि शोषित घटकांना न्याय देण्यासाठी ही युती भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जाणार असून, सर्व सामान्य जनतेचा कौल आमच्या बाजूने असेल,” असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मैदानात उतरलेले शिलेदार -विंझर-पानशेत गट: अमोल देवगिरीकर -विंझर गण : प्रदीप कांबळे (खुला प्रवर्ग) -पानशेत गण : अमिषा संतोष गायकवाड (सर्वसाधारण महिला) -वांगणी-वेल्हा गट: रामभाऊ मरगळे (ओबीसी पुरुष) -वांगणी गण : दिलीप रणखांबे (सर्वसाधारण) -वेल्हा गण : ओबीसी महिला.