एबी फॉर्मचा पेच आणि शेवटच्या क्षणी पक्षांतरे; शिरूर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी बहुरंगी लढतीचे संकेत. ZP election 2026: शिरूर – पुणे जिल्हा परिषद आणि शिरूर पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिरूर तालुक्यात राजकीय उत्साहाचे उधाण पाहायला मिळाले. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आणि अपक्ष इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज सादर केल्याने शिरूर शहरात राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. ढोल-ताशांचा गजर, वाहनांच्या रांगा आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे तहसीलदार कार्यालय परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.मोठ्या संख्येमुळे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होण्याची चिन्हे आहेत. टाकळी हाजी–कवठे येमाई गटातून भाजपचे राजेंद्र गावडे, दामूआण्णा घोडे, बाळासाहेब डांगे आणि डॉ. सुभाष पोकळे यांनी तुल्यबळ शक्तीप्रदर्शन केले. शिरूर–न्हावरे गटातून दिवंगत आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पत्नी मालती पाचर्णे यांनी भावूक वातावरणात भाजपचा अर्ज भरला. तर, राष्ट्रवादीत उमेदवारी न मिळाल्याने तृप्ती सरोदे यांनी शिंदे शिवसेनेच्या वतीने शिरूर ग्रामीण गणातून अर्ज दाखल केला. दाखल झालेले अर्ज जिल्हा परिषदेच्या ७ गटांसाठी ५३ उमेदवारांनी एकूण ८२ अर्ज, तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी १०५ उमेदवारांनी १४७ शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्मचा घोळ काही ठिकाणी एकाच पक्षाचे दोन अर्ज आले, तर काही उमेदवारांना शेवटच्या क्षणी पक्षांतर करून एबी फॉर्म मिळवावा लागला. तहसील कार्यालयाबाहेर कोरे एबी फॉर्म घेऊन नेतेमंडळी बसल्याचे चित्र होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे, कुसुम मांढरे आणि भाजपच्या कुसुम खैरे यांनीही मोठ्या रॅली काढून अर्ज भरल्याने महिला उमेदवारांचा प्रभाव अधोरेखित झाला आहे. या घडामोडींमुळे आता तालुक्यातील राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.