वाघोली : अष्टापूर तालुका हवेली येथील खोलशेत येथे दुसरा बिबट्या जेर बंद करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. गेल्या ११ दिवसांमध्ये दुसरा बिबट्या जेर बंद करण्यात आला आहे. वन विभागाला यश गेल्या दोन दिवसांपूर्वी याच बिबट्याने अष्टापुर माळवाडी येथील बिरोबाचा माळ येथे चार मेंढ्या मारल्या होत्या. त्यामुळे मेंढपाळांनी बिबट्या जेरबंद केल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. वन विभागाच्या कामगिरीचे ग्रामस्थानी कौतुक केले आहे. ‘अष्टापुर येथे दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. वन विभागाला यश आले असून ग्रामस्थांनी जेरबंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यास देखील यश आले आहे.’ – प्रमोद हरगुडे माजी सरपंच, केसनंद