प्रभात वृत्तसेवा लोणीकंद – हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ येथे 1 जानेवारी रोजी होणार्या अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी विजयस्तंभ परिसरास भेट देऊन पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल, समाज कल्याण आयुक्त दीपा मुंडे, बार्टी संस्थेचेमहासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त तथा बार्टीचे निबंधक विशाल लोंढे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, तहसीलदार तृप्ती कोलते, लोणीकंद पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी वाहनतळ, वाहतूक नियोजन तसेच भाविकांसाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. विजयस्तंभ परिसरातील नियोजनाबाबत संबंधित अधिकार्यांशी सविस्तर चर्चा करून, भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.यावेळी पोलीस विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.