प्रभात वृत्तसेवा माळेगाव – राज्यातील अग्रगण्य असलेल्या दि. माळेगाव सहकारी साखर कारखान्यास राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी भेट दिली. यावेळी डॉ. कोलते यांनी माळेगावात एआय, नव्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच कारखान्यातील आधुनिक प्रणालीचे कौतुक केले.यावेळी प्रादेशिक सहसंचालक निलीमा गायकवाड, कार्यकारी अभियंता व सदस्य सचिव स्थापत्य बांधकाम समिती पुणे सविता दळवी, विशेष लेखापरीक्षक डी.एन. पवार उपस्थित होते.यावेळी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन संगिता कोकरे यांनी स्वागत केले. संचालक मंडळानेही त्यांचा सत्कार केला. कृषी विज्ञान केंद्र, शारदानगरचे प्रतिनिधी तुषार जाधव यांनी ऊस शेतीत एआयचा वापर कसा करावा याबाबत सादरीकरण केले. संचालक नितीन सातव यांनी उत्पादन व आर्थिक विभागातील एआयच्या वापराबाबत प्रेझेन्टेशन दिले. संचालक योगेश जगताप यांनी कारखान्याचे कामकाज वनव्या सी.बी.जी. प्रकल्पाची माहिती दिली. संचालक शिवराज जाधवराव यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळामुळे शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या क्रांतीची माहिती दिली.यावेळी कोलते म्हणाले की, माळेगाव कारखान्यात एआयचा वापर, टिश्यु कल्चर बेणे, यांत्रिक ऊसतोडणी या बाबी भविष्यात अधिक प्रभावी ठरतील. कारखान्याच्या उज्ज्वल वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी व्हाईस चेअरमन संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, संचालक शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले, तानाजी कोकरे,योगेश जगताप, स्वप्नील जगताप, गणपत खलाटे, विजय तावरे, प्रताप आटोळे, सतीश फाळके, अविनाश देवकाते, जयपाल देवकाते, देविदास गावडे, नितीन सातव, रतनकुमार भोसले, ज्योती मुलमुले, नितीन शेंडे, विलास देवकाते, रामदास आटोळे, विशाल जगताप,दत्तात्रय येळे, कामगार संचालक आनंदराव जगताप, कार्यकारी संचालक अशोक पाटील तसेच सभासद,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालक अविनाश देवकाते यांनी आभार मानले. साखर आयुक्तांची बांधावर हार्वेस्टरची पाहणी फिंन्डेबिलिटी सायन्सेसचे मंदार कुलकर्णी यांनी उत्पादन विभागातील एआयचा वापर व भविष्यातील संधी यावर मार्गदर्शन केले.साखर आयुक्तांनी कारखान्याची पाहणी करताना नवीन बसविलेल्या टिपलर टेबल व केन कॅरिअर यंत्रणा, शाश्वत ऊस रोप वाटिका, ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांचा प्रात्यक्षिक प्लॉट, ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी सुरु केलेली साखर शाळा तसेच शेतकरी चंद्रकांत एकनाथ काळे व विठ्ठल दामोदर सुतार यांच्या शेतावर मशीन हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणीची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली.