प्रभात वृत्तसेवा मंचर – आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा परिषद-ग्रामीण पंचायत विभागामार्फत आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील तीर्थक्षेत्र विकास कामांसाठी 1 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील गणपती मंदिर भक्त निवासासाठी 25 लाख रुपये, सिद्धेश्वर मंदिर भक्त निवासासाठी 25 लाख रुपये, चास येथील संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी भक्त निवासासाठी 25 लाख रुपये, केदुर कान्होजी महाराज समाधी मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या सुधारणेसाठी 25 लाख रुपये, तसेच शिरूर तालुक्यातील विविध मंदिरांकडे जाणार्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 15 लाख रुपयांचा समावेश आहे. याशिवाय मोराची चिंचोली येथील भक्त निवास दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांसाठी एकूण 1 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.