प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – महाविद्यालयीन युवतीवर तिच्या ओळखीच्या तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवतीला महाविद्यालयातून येत असताना स्विफ्ट कारमधून गावातील एका कॅफेमध्ये नेऊन, तिच्या आई-वडिलांना व भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन हा अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन युवती महाविद्यालयातून येत असताना तिच्या ओळखीचा अभिराज प्रमोद चव्हाण (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर, जि. पुणे) याने तिला त्याच्या स्विफ्ट कारमधून शिक्रापूर येथील ‘१९०६’ नावाच्या कॅफेमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने युवतीला ‘तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणून, तिच्या आई, वडील व भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या घटनेनंतर युवतीने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला आणि शिक्रापूर पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अभिराज प्रमोद चव्हाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर करत आहेत.