प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सासवड शहरात राजकीय तापमान वाढू लागले असून प्रभाग क्रमांक 11 ब मधून भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक पदासठी उमेदवारी अर्ज करणारे अजित काळुराम जगताप यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना विकासाचे निश्चित आश्वासन दिले आहे. प्रभागातील लाईट, पाणी, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधा प्रश्नांना प्राधान्य देत ते माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रश्न तत्काळ सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 11 ब मधून उभे असलेले अजित जगताप यांनी सांगितले. दरम्यान, एक कॉल, काम ओके, अशी अजित जगताप यांची ख्याती आहे. नागरिकांना आवश्यक असलेला वेळ देणे, त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेणे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणे हेच आपल्या कामाचे ब्रीद असल्याचे ते म्हणाले. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत सुविधा पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. माजी आमदार संजय जगताप नेतृत्वात आम्ही मजबुतीने उभे राहून विकासाला गती देऊ, असा विश्वास अजित जगताप यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदीकाकी जगताप यांच्यासह आपल्या पॅनलमधील सर्व नगरसेवक उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. एकदिलाने मतदान करून स्थिर, सक्षम व विकासाभिमुख नेतृत्व घडविणे हे आता सासवडकरांच्या हातात आहे. भाजप पॅनलमधील नगरसेवक उमेदवारांमध्ये सारिका हिवरकर, मनोहर जगताप, लीना वढणे, दिनेश भिंताडे, शितल भोंडे, ज्ञानेश्वर जगताप, सोपान रणपिसे, स्मिता जगताप, मोनिका म्हेत्रे, मयुर चौखंडे, अर्चना जगताप, राजन जगताप, स्मिता जगताप, प्रवीण पवार, सुहास लांडगे, सुमाली राऊत, प्रदीप राऊत, प्रियंका जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, दीप्ती सूर्यवंशी यांचा समावेश आहे. सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देऊन प्रभागाचा आणि सासवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रभाग 11 ब मध्ये आश्वासक हाक निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा प्रचाराला वेग येत असून नागरिकांकडूनही विविध पक्षांच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रभाग 11 ब मध्ये विकासाच्या आश्वासनांसह बदलाची हाक देणारा हा भाजपचा प्रचार नागरिकांच्या प्रतिसादाने अधिक गती घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.