प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील औद्योगिक वसाहतीमधील एलजी आणि फियाट कंपनीच्या आवारात कामगारांना दिसलेला बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे. शिरूर वनविभागाच्या दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने औद्योगिक वसाहत विभागात समाधानाचे वातावरण आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एलजी आणि फियाट कंपनीत बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने बिबट्याचा शोध घेतला. शोध घेऊनही बिबट्या न सापडल्याने फियाट कंपनीच्या आतमध्ये दोन पिंजरे लावण्यात आले. अखेर गुरूवारी (दि. ४) पहाटे सुरक्षारक्षकांना पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसले. याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनपरिमंडळ अधिकारी भानुदास शिंदे आणि वन्यजीव बचाव पथकाचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे पाच वर्षे वयाचा आणि नर आहे. त्याला फियाट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खत्री यांसह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील औद्योगिक वसाहतीमधील एलजी आणि फियाट कंपनीच्या आवारात कामगारांना दिसलेला बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात यशस्वीरीत्या जेरबंद करण्यात आला आहे. शिरूर वनविभागाच्या दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाल्याने औद्योगिक वसाहत विभागात समाधानाचे वातावरण आहे आणि या तातडीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. एलजी कंपनीत प्रथम तर नंतर फियाट कंपनीत कामगारांना बिबट्या दिसल्याने मोठी खळबळ उडाली होती. शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने दोन दिवस सलग शोधमोहीम राबवली. प्रारंभी शोधमोहीम अपयशी ठरली, मात्र फियाट कंपनीच्या आवारात लावलेल्या दोन पिंजऱ्यांपैकी एका पिंजऱ्यात अखेर गुरूवारी (दि. ४) पहाटे सुरक्षारक्षकांना बिबट्या अडकल्याचे दिसले. याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे, वनपरिमंडळ अधिकारी भानुदास शिंदे, वन्यजीव बचाव पथकातील मनोज चौधरी, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, संदीप गव्हाणे, जयेश टेमकर, मंगेश ओव्हाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे पाच वर्षे वयाचा आणि नर आहे. त्याला फियाट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खत्री, सुधीर भाले, गौतम भोसले, सरवर शेख व आशिष शर्मा यांच्या उपस्थितीत सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे.