Pune ZP Election – पुरंदर तालुक्यातील एकूण ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गणाकरिता (दि.७) रोजी मतदान होत आहे. जिल्हा परिषद गटामध्ये गराडे , बेलसर, वीर, नीरा ४ असे एकूण १९ उमेदवार तसेच गराडे, दिवे, माळशिरस, बेलसर, भिवडी, वीर, कोळविहिरे, नीरा शिवतक्रार ५ असे एकूण ३३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. गट आणि गणातील एकूण ५२ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.नवीन प्रशासकीय इमारत सासवड येथे ९ फेब्रवारी रोजी मतमोजणी होणार आहे. याकरिता प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे. पंचायत समिती गणातही जोरदार लढती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील एकूण ४ गट व ८ गणांकरिता जिल्हा परिषद गटामध्ये गराडे ३, बेलसर ६, वीर ६, निरा ४ असे एकूण १९ उमेदवार तसेच गराडे ३, दिवे ३, माळशिरस ५, बेलसर ५, भिवडी ३, वीर ५, कोळविहिरे ४, निरा शिवतक्रार ५ असे एकूण ३३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. गणांसाठी उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होणार आहे. हे उमेदवारांच्या संख्येवरून दिसत आहे. १ लाख ८९ हजार मतदार हक्क बजावणार निवडणूक कामकाजाच्याअनुषंगाने ३२ तालुकास्तरीय समन्वय अधिकारी, २० क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एकूण ८ भरारी पथकामध्ये १६ आणि ८ स्थिर निरीक्षण पथकामध्ये १६ तसेच २ व्हिडीओ निरीक्षण पथकात १ तसेच २ व्हिडीओ व्हिंविंग पथकामध्ये ८ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेकरिता एकूण २३८ अधिकारी, कर्मचारी तथा शिक्षकगण नियुक्त केलेले आहेत. जिल्हा परिषद पुणे निवडणूक घोषित झालेल्या क्षेत्राची लोकसंख्या १८९८२३ असून त्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीकरिता मतदार संख्या पुरुष ९५ हजार २७१, महिला ९५ हजार १२९, इतर ३ असे एकूण १ लाख ९४ लाख ४०३ इतकी आहे. एकूण २३५ केंद्र, ५५३ मतदारांनी टपाली पुरंदर तालुक्यात २३५ केंद्र आहेत. याअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे नवीन इमारत उत्तरभिमुख इमारत पूर्वेकडील खोली क्रमांक २ येथे महिला मतदान केंद्र तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे जुनी पूर्वाभिमुख इमारत खोली क्रमांक १ येथे आदर्श मतदान केंद्र असणार आहे. कंट्रोल युनिट (सीयू) २३५, बॅलेट युनिट (बीयू) २३५ याव्यतिरिक्त सीयू २४ आणि बीयू २४ राखीव ठेवण्यात येणार आहे. टपाली मतदानाकरिता ६११ अर्ज प्राप्त झाले आहे. आजअखेर ५५३ मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले आहे. मतदारांकरिता मतदार केंद्रावर सुविधा प्रत्येक केंद्रावर स्वच्छतागृह, पाळणा, व्हीलचेअर, रॅम्प, वैद्यकीय सुविधा, पोलीस संरक्षण, अग्निशामक, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित तसेच प्रसारमाध्यमातून मतदान करण्याबाबत प्रसिध्दी दिली आहे. विजयी उमेदवारांची नावे १० फेब्रुवारी रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या येणाऱ्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहेत.