Pune ZP Election – तळेगाव ढमढेरे–रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार दिपाली राहुल गव्हाणे यांनी निवडणूक प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. उच्चशिक्षित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या दिपाली गव्हाणे सध्या दोन्ही गणात समतोल राखत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत. केवळ आश्वासने न देता विकासाचे व्हिजन त्या मतदारांसमोर मांडत असल्याने त्यांच्या प्रचाराला गावोगावी मोठा प्रतिसाद मिळत आहे.दिपाली गव्हाणे या डिजिटल युगाची गरज ओळखून युवक, महिला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांचे पती राहुल गव्हाणे हे यशस्वी उद्योजक असून “युवकांनी नोकरी देणारे बनावे” या विचाराने ते तरुणांमध्ये कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून देत आहेत. गव्हाणे कुटुंबीयांनी डिंग्रजवाडी ग्रामपंचायतीला ‘रोल मॉडेल’ म्हणून विकसित केले असून, तोच अनुभव आता संपूर्ण गटाच्या विकासासाठी वापरण्याचा त्यांचा मानस आहे. विठ्ठलवाडी येथे प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, विकास केवळ कागदावर न राहता तो प्रत्येकाच्या आयुष्यात दिसला पाहिजे, यासाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी अविनाश गवारे, महेंद्र गवारे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषद पुणे वसा, वारसा आणि विश्वासाची एकजूट तळेगाव ढमढेरे पंचायत समिती गणातून विद्या राजेंद्र भुजबळ या स्व. संभाजीराव भुजबळ यांचा विचारांचा वारसा पुढे नेत आहेत. सासरे अरुण भुजबळ आणि पती राजेंद्र भुजबळ यांच्या प्रशासकीय अनुभवाचा पाया त्यांच्या पाठीशी आहे. सेवा आणि जनसंपर्क यांची सांगड घालणारी ही साथ दिपाली गव्हाणे यांच्या नेतृत्वाला अधिक बळ देणारी ठरत आहे. विकास मोहीम निर्णायक ठरणार रांजणगाव सांडस पंचायत समिती गणातून हनुमंत बापू काळे यांना स्थानिक प्रश्नांची सखोल जाण आहे. त्यांचा गावोगावी असलेला थेट जनसंपर्क आणि लोकांच्या अडचणींशी असलेली आपुलकी दिपाली गव्हाणे यांच्या विकास मोहिमेसाठी निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत.