प्रभात वृत्तसेवा वाघोली – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपा-आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार दौरा जोमात सुरू असून, विविध भागांतून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशी माहिती उमेदवार रामभाऊ दाभाडे यांनी दिली. विमाननगर येथील कोणार्क कॅम्पस, रोहन मिथिला सोसायटी, लुंकड गोल्ड कॉस्ट तसेच वाघोली परिसरातील कमल बाग, जेड रेसिडेन्सी (फेज 1 व 2), मॅजेस्टिक सिटी, रेन्बो ग्रेस, डायमंड क्रिस्ट, रेवा सोसायटी आदी ठिकाणी उमेदवारांनी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या प्रचार दौर्यादरम्यान पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, पार्किंग व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, हरित क्षेत्रे तसेच इतर नागरी मूलभूत सुविधा या प्रमुख विषयांवर उमेदवारांनी आपली विकासाची स्पष्ट भूमिका मांडली. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा व सूचनांची नोंद घेत त्यावर प्रभावी व वेळबद्ध उपाययोजना करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.अ गटाचे उमेदवार श्रेयस खांदवे म्हणाल्या, आरोग्य, वाहतूक आणि मूलभूत सुविधा या विषयांवर ठोस आणि कालमर्यादेत काम करणे ही आमची प्राथमिकता आहे. ब गटाचे उमेदवार अनिल सातव यांनी सांगितले, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय करणे हेच आमचे ध्येय आहे.क गटाच्या उमेदवार ऐश्वर्या पठारे म्हणाल्या, लोकांशी सातत्यपूर्ण संवादातूनच विकास घडतो. प्रभाग क्रमांक 3 चा विकास आधुनिक, सुरक्षित व नियोजनबद्ध असायलाच हवा. ड गटाचे उमेदवार रामदास दाभाडे यांनी, लोकसहभागातूनच खरा विकास साध्य होतो आणि तोच आमच्या कार्यपद्धतीचा पाया असेल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रचार दौर्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत असून प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकासकेंद्रित, लोकाभिमुख नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. “प्रभाग क्रमांक 3 च्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या प्रश्नांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. येणार्या निवडणुकीत आपल्या भागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या लाडक्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी साथ द्या.” – रामभाऊ दाभाडे, प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार