राजगुरुनगर : राज्यातील पोलीस पाटीलांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष अमोल पाचपुते यांनी दिली. पोलीस पाटील बांधवांचे प्रश्न मार्गी लागावेत व त्यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासन सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. हेही वाचा : Pune District : भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर चाकणकरांंचा संताप या बैठकीस गृह विभागाचे उपसचिव रविंद्र औटे, अवर सचिव भिकन ठाकूर, राज्य पोलीस मुख्यालय विभागाचे एस.पी. सागर पाटील यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष साहेबराव राळे, खजिनदार निळकंठ थोरात, हनुमंत देवकाते, एकनाथ बानते, अमित शिंदे, सागर जाधव, भास्कर कंकाळ, कुणाल लोंढे, सुधाकर गाडे, अविनाश शेंडगे, मोनिका कचरे, सुहास दिवेकर, शारदा दातीर, संजय जाधव आदींसह राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मागण्यांवर चर्चा या बैठकीत पोलीस पाटीलांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर विचारविनिमय करण्यात आला. यामध्ये निवृत्ती वय 60 वरून 65 वर्षे करणे, मानधन वेळेवर देणे, वाळू ड्युट्या रद्द करणे, प्रवास भत्ता दुप्पट करणे, अनुकंपा तत्व लागू करणे, सेवा निवृत्तीनंतर एकरकमी 20 लाख रुपये देणे तसेच विमा संरक्षण देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. हेही वाचा : Pune News : स्वीकृत नगरसेवक दहा की आठ?; दोन सदस्य अपात्र झाल्याची चर्चा