शिरूर : तहसिलदार शिरूर यांच्या दालनामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाची आढावा बैठक तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख आणि ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या संस्थेचे पदाधिकारी आणि साधक उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय दिन ग्राहक सप्ताहाच्या कार्यक्रमाची व्यवस्थित आखणी, नियोजन झालेले आहे. सर्वच शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालयाची माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिका तयार कराव्यात. यामधून ग्राहकांचे प्रबोधन होईल. सप्ताहामध्ये सर्वच विभागांनी आपापसात समन्वय साधून या सप्ताहात आपला कृतिशील सहभाग नोंदवावा. तसेच 24 डिसेंबर (राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या) या दिवशी तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन व्हावे अशा सूचना पंचायत समिती शिक्षण विभागाला दिल्या. या बैठकीस ग्राहक पंचायत संस्था पुणे, राज्य अध्यक्ष अशोक भोरडे, तालुकाध्यक्ष अरुणकुमार मोटे, उपाध्यक्ष अतुल पाचुंदकर, सचिव उद्धव जाधव, संघटक ओंकार जाधव, सहसंघटक योगेश शेंडगे, सर्वश्री. संतोष साखरे भागिनाथ फंड, गणेश कोतवाल, बापूसाहेब शिवले, नामदेव शिवले, अमित राऊत, प्रमोद चौधरी, प्रदीप रासकर व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, शिरूरचे पो नि. संदेश केंजळे, रांजणगाव पो. स्टेशनचे पो. नि. महादेव वाघमोडे, पुरवठा निरीक्षक सदाशिव व्हनमाने, तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक, वनपरिक्षेत्राधिकारी निळकंठ गव्हाणे, उपअभियंता स्थापत्य अ. मगर, उपअभियंता MIDC रांजणगाव, उपकार्यकारी अभियंता महावितरण शिरूर शरद माने, सहाय्यक वाहतूक अधिक्षक भैरवनाथ दळवी, दुय्यम निबंधक ए. व्ही. जाधव, विस्ताराधिकारी शिरूर एस. घोडे, सामाजिक वनीकरणचे बबन गायकवाड, दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे सुरज बाबर, भूमीअभिलेखचे संजय गुरव, वजन मापे निरीक्षक संतोष दराडे, पोलीस उपनिरीक्षक शिक्रापूर जितेंद्र पानसरे आदी बैठकीस उपस्थित होते. पुरवठा निरीक्षक दिपक केदार यांनी आभार मानले. सदर बैठकीत ग्राहक दिनानिमित्त ग्राहक हक्क, तक्रार नोंदणी प्रक्रिया आणि कायदेशीर तरतुदी याबाबत मार्गदर्शन तसेच नागरिकांना योग्य सेवा, पारदर्शक व्यवहार आणि फसवणूक टाळण्यासाठी,ग्राहक तक्रारींचे वेगवान आणि प्रभावी निराकरण करण्याबाबत तालुक्यात ग्राहक जनजागृती मोहीम राबविण्याबाबत नियोजन करण्याचे ठरले.