प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर शहराच्या विकासाकरिता आम्ही नगरसेवक कटिबद्ध राहू.शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील.अशी ग्वाही नगराध्यक्षा राजश्री गांजाळे यांनी दिली.मंचर (ता.आंबेगाव) येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन २०२६ ची दिनदर्शिका प्रकाशन व मंचर नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा संस्थेचे अध्यक्ष सीताराम लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमप्रसंगी नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा राजश्री गांजाळे, नगरसेवक वंदना बाणखेले,उर्मिला प्रवीण मोरडे, वसंतराव बाणखेले,विकास जाधव, डॉ.सोनाली विकास बाणखेले, धनेश मोरडे, अंजली बाणखेले, संदीप थोरात, रविकिरण आवळे, शिवाजी राजगुरू, इम्रानअली मीर, अंशरा शेख, मालती थोरात,माणिक गावडे, पल्लवी गांजाळे, बेबी थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थित त्यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविकात संस्थेचे उपाध्यक्ष मंगेश बाणखेले यांनी संस्थेच्या ठेवी ७५ कोटी रुपये, तसेच पतसंस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. कार्यक्रमास संचालक पुरुषोत्तम पोकार, सुदाम बेंडे, दिलीप महाजन, शांताराम बाणखेले, मनीष ठक्कर, बाबाजी इंदोरे, पप्पुशेठ थोरात, अश्विनी शेटे, अनिता निघोट, अजेस भोंडवे व जितेंद्र सोनवणे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.आभार अश्विनी शेटे यांनी मानले.