प्रभात वृत्तसेवा मंचर – हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई काळंबादेवी येथून आणलेल्या प्राणज्योतीचे स्वागत एकलहरे, कळंब आदी गावांमध्ये जल्लोषात आणि उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.एकलहरे येथे ज्योतीचे स्वागत प्रा.वसंत भालेराव, माजी सरपंच शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डोके,उपसरपंच प्रदीप शिंदे, देविदास डोके,राहुल डोके,महमंदशरीफ शेख यांच्यासह एकलहरे,शिंदेवाडी ग्रामस्थांनी केले. कळंब ग्रामपंचायत चौकात ज्योत दाखल झाल्यानंतर हुतात्मा बाबू गेनू अमर रहे,जय जवान जय किसान,भारत माता की जय या घोषणा देऊन चौक तरुणांनी दणाणून सोडला होता. कळंब या ठिकाणी ज्योतीचे स्वागत राष्ट्रीय ज्ञानलक्ष्मी विकास प्रतिष्ठान कळंब आणि समस्त ग्रामस्थ कळंब यांच्यावतीने ज्योतीचे पूजन व औक्षण करून शाल, श्रीफळ,पुष्पहार घालून व संविधान प्रत देऊन आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती उषा कानडे,माजी सरपंच राजश्री भालेराव, शिक्षिका मनीषा कानडे,पूजा भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपसरपंच कमलेश वर्पे,माजी उपसरपंच प्रताप भालेराव,सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव,सेवानिवृत्त शिक्षक माधव कानडे,माजी ग्रामपंचायत सदस्य भरत कानडे, महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्तशिक्षक बाळासाहेब कानडे, शिवसेना तालुकाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, उद्योजक मयूर भालेराव,तंटामुक्ती उपाध्यक्ष विजयकुमार कहडणे, उद्योजक प्रमोद पिंगळे, शिवसेना समन्वयक रोहन कानडे, चंद्रकांत भालेराव,मोहन भालेराव, यशवंत भालेराव,रवी वर्पे,ऋषी वर्पे उपस्थित होते. मुंबईवरून ज्योती बरोबर हुतात्मा बाबूगेनू ट्रस्टचे अध्यक्ष बाबाजी चासकर,प्रा.वसंत भालेराव,कुशाभाऊ सैद,डॉ.दत्ता चासकर यांच्यासह अनेक तरुण व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.