भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोरील रस्ता व पुलाचे काम सणसर पर्यंत श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम सध्या चालू आहे ते काम आज पासून करून दिले जाणार नसल्याचा निर्णय श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सणसर ग्रामपंचायतचे सरपंच यशवंत पाटील सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी एकमताने घेऊन हा रस्ता कारखान्याच्या बाजूने ( बायपास) करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. इंदापूर व बारामती तालुक्यातील ५३ गावांचे क्षेत्र असलेला श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना हा इंदापूर व बारामती तालुक्याच्या सीमेवर आहे. व त्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष मी पृथ्वीराज जाचक असल्यामुळे जरी मी सणसर गावचा रहिवासी नसलो तरी साखर कारखान्याचा अध्यक्ष नात्याने ५३ गावचे पालकत्व माझ्याकडे आहे त्यामुळे सणसर येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीस श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे प्रकल्प अधिकारी श्री घोडके तसेच रस्त्याचे ठेकेदार श्री चव्हाण श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सणसर गावचे सरपंच यशवंत पाटील, माजी सरपंच पार्थ निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, एडवोकेट विलास खटके, शिवाजी काळे, करण निंबाळकर, किरण गायकवाड, विशाल निंबाळकर, पिंटू गुप्ते, शब्बीर काझी आदी मान्यवर तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत या भागातून बायपास रस्ता होत नाही तोपर्यंत या ठिकाणी काम करू दिले जाणार नाही असा इशारा यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीने देण्यात आला. श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्या समोरून न जाता हा रस्ता छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बाहेरून बायपास पद्धतीने करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, कृषी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे प्रकल्प अधिकारी श्री घोडके, या रस्त्याचे ठेकेदार श्री चव्हाण यांची एकत्र बैठक घेऊन या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेऊन या बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची परवानगी दिली जाणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे जोपर्यंत बायपास पद्धतीने रस्त्याचा प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत या रस्त्याचे काम करू नये अशी प्रखर भूमिका उपस्थित त्यांनी घेतली. मात्र या रस्त्यालगत असणारी बंदिस्त गटार लाईन, वॉटर सप्लाय तसेच गावाच्या आरोग्यासाठी ज्या काही सुख सुविधा असतील ते कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या समोरील रस्ता व पुलाचे काम सणसर पर्यंत होऊ दिले जाणार नाही जोपर्यंत या भागातून बायपास रस्ता मंजूर होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन याबाबतीत सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करण्यास देखील तयार आहे. त्यामुळे श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बाजूने बायपास करावा अशी मागणी यावेळी उपस्थित त्यांनी केली.