Baramati Election – बारामतीतील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणातील निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच झालेल्या या निवडणुकीत वर दुःखाचा सावट राहिले. त्यामुळे निरुत्साही वातावरणात संपूर्ण तालुक्यात मतदान पार पडले.बारामतीत जिल्हा परिषदेच्या ६ गटांसाठी तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २९९ मतदान केंद्रावर मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या बारामती तालुक्यात मतदानादिवशी देखील घड्याळाची टिकटिक ऐकू आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट तयार झाली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच बहुजन समाज पक्षाने निवडणुकीच्या उमेदवार रिंगणात उतरवले. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कोणत्याही पक्षाने जोरदार प्रचार यंत्रणा राबविली नाही. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला. उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटी घेणे पसंत केले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जोश नसल्याचे पहावयास मिळाले. ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचाच बोलबाला राहिला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १८.२१ मतदान झाले. त्यानंतर दीड वाजेपर्यंत ३०.२४ टक्के मतदानाची नोंद झाली. साडेतीनच्या सुमारास ४०.८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार पारगाव, सुपा गणात बाय पारवडी व सुपा गणात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजपला बाय दिल्याची चर्चा होती. पारवडी गणात भाजप नेते बाळासाहेब गावडे यांचे चिरंजीव अनिकेत गावडे हे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत. तर सुपे गणात भाजप नेते दिलीप खैरे यांचे निकटवर्ती पोपट खैरे यांच्या पत्नी उज्वला खैरे या भाजपच्या वतीने रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने उमेदवार दिले नसल्याने अपक्ष उमेदवार व भाजपचे उमेदवार यांच्यामध्ये लढत होणार आहे. त्यामुळे यामुळे या दोन्ही लढतीकडे लक्ष लागले आहे. बारामतीकर अजूनही सावरले नाहीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बारामती प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. काही ठिकाणी पिंक थीम राबवत मतदारांना आकर्षित केले . मतदान केंद्रावर सजावट देखील करण्यात आले होती. सकाळपासूनच मतदारांनी काही ठिकाणी रंगाला व मतदान केले. त्यानंतर दुपारच्या सत्रात मतदान कमी प्रमाणात झाले. सायंकाळच्या वेळी पुन्हा मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली.तरी देखील बारामतीत मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अजूनही बारामतीकर सावरले नाहीत.