पुणे जिल्ह्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख; ‘बजाज पुणे ग्रँड टूर’च्या तिसऱ्या टप्प्याचा बारामतीत दिमाखदार समारोप. Ajit Pawar: बारामती – ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील विजेत्या सायकलपटूंना बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय परिसर, भिगवण रोड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून या टप्प्याचा समारोप करण्यात आला. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, ग्रँड टूर या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यात अडथळे विरहित व दर्जेदार रस्त्यांची निर्मिती झाली असून त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होत आहे. स्पर्धेमुळे देश-विदेशातील नागरिकांना पुणे जिल्ह्याची ओळख होत असून, नामवंत खेळाडूंचे कौशल्य, स्पर्धेचा मार्ग, पायाभूत सुविधा तसेच पर्यटनाच्या दृष्टीने परिसराची क्षमता अधोरेखित होत आहे. नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी, त्यांच्यात खिलाडूवृत्ती व स्पर्धात्मकता वाढावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकार, राज्य शासन आणि पुणे जिल्हा प्रशासन समन्वयाने कार्य करत असून बजाज, सिरम इन्स्टिट्यूट, पंचशील ग्रुप यांसारख्या नामांकित कंपन्या, आरोग्य संस्था, बारामती : ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यातील विजेत्या सायकलपटूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविल्याबद्दल पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. “स्पर्धेच्या मार्गालगत नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी आदी घटक स्वयंशिस्त पाळून खेळाडू व त्यांचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी दुतर्फा उभे होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण होते. अशा दर्जेदार आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. या स्पर्धेसाठी अत्यंत उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून स्पर्धेचे मार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचे असल्याचे सायकलपटूंनीही सांगितले.” – अजित पवार, उपमुख्यमंत्री