Vadgaon Maval : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बहुतेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाच गटांमधून १४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. तर पंचायत समितीच्या दहा गणांमधून २३ उमेदवारांनी माघार घेतली असून २७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण मिळून एकूण ३७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी (प्रांत) सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक अधिकारी (तहसीलदार) विक्रम देशमुख यांनी दिली. जिल्हा परिषद गटांमध्ये इंदोरी, खडकाळा व सोमाटणे गटात भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्यात सरळ लढती होत आहेत. तर कुसगाव व टाकवे गटात तिरंगी लढती होत असून येथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि उबाठा यांच्यात सामना रंगणार आहे. पंचायत समिती गणांमध्ये काले, चांदखेड व वराळे गणात दुरंगी लढती होत आहेत. तर टाकवे, नाणे, कार्ला, कुसगाव, इंदोरी, सोमाटणे व खडकाळा गणात तिरंगी लढती होत असल्याने या गणांमध्ये निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाल्याने आता प्रचाराला वेग येणार असून, मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद गटनिहाय रिंगणात असलेले उमेदवार इंदोरी गट पल्लवी संदीप दाभाडे – राष्ट्रवादी भागवत मेघा प्रशांत – भाजप खडकाळा गट आशा बाबुराव वायकर – भाजपा दिपाली दीपक हुलावळे – राष्ट्रवादी काँग्रेस सोमाटणे गट शितल गराडे – भाजपा मनीषा मुऱ्हे – राष्ट्रवादी काँग्रेस कुसगाव गट संतोष राऊत – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) दत्तात्रय गुंड – भाजपा भगवान डफळ – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) सुधीर गरवड – अपक्ष टाकवे गट अशोक दाते – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मधुकर कोकाटे – भाजपा अनंता पावशे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पंचायत समितीनिहाय गणातील रिंगणात असलेले उमेदवार टाकवे बु गण प्राची देवा गायकवाड – राष्ट्रवादी काँग्रेस अश्विनी कोंडे – शिवसेना (शिंदे) प्राजक्ता शिंदे – काँग्रेस आय नाणे गण आशा ज्ञानेश्वर मोरमारे – राष्ट्रवादी काँग्रेस संगीता आढारी – भाजपा चैताली मोरमारे – अपक्ष इंदोरी गण दिलीप नामदेव ढोरे – राष्ट्रवादी काँग्रेस श्रीकृष्ण आण्णासाहेब भेगडे – भाजपा ऍड. अजय केदारी – अपक्ष कार्ला गण रेश्मा राजू देवकर – राष्ट्रवादी काँग्रेस रंजना गायकवाड – भाजपा अश्विनी भेगडे – उबाठा खडकाळा गण समीर खंडू जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस प्रकाश गायकवाड – भाजपा संदीप कदम – अपक्ष कुसगाव गण योगेश मुरलीधर लोहोर – राष्ट्रवादी काँग्रेस नवनाथ हरपुडे – भाजपा अविनाश जांभुळकर – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) काले गण शैला रामचंद्र कालेकर – राष्ट्रवादी काँग्रेस सीमा ठाकर – भाजपा सोमाटणे गण साहेबराव नारायण कारके – राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेब पारखी – भाजपा संभाजी लेंडघर – काँग्रेस आय चांदखेड गण सुनिता मनोहर येवले – राष्ट्रवादी काँग्रेस सुवर्णा घोटकुले – भाजपा वराळे गण राजेंद्र कडलक – राष्ट्रवादी काँग्रेस रवी शेटे – भाजपा