पिंपरी – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार उमेदवार विशाल आहेर यांनी आपल्या जनसंपर्काचा धडाका लावला आहे. एका बाजूला माजी महापौरांचे तगडे आव्हान समोर असताना वसंत बोराटे आणि विशाल आहेर यांनी आपल्या व्हिजनरी कार्यशैलीने आणि कामाच्या जोरावर या लढतीला मोठी धार निर्माण करून दिली आहे. विशाल आहेर यांच्या प्रचाराची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांचा सर्वसामान्य चेहरा ही आहे. एका साध्या कष्टकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व असल्याने जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी आणि विश्वास पाहायला मिळत आहे. तरुणांमध्ये असलेली त्यांची क्रेझ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेली त्यांची तत्परता यामुळे या मतदारसंघात तरुण विरुद्ध अनुभवी असा रंगतदार सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आहेर यांच्याकडे विकासाचे एक स्पष्ट व्हिजन असून त्यांची त्वरित निर्णय घेण्याची क्षमता प्रशासकीय पातळीवरही कौतुकास्पद ठरत आहे. प्रभागातील पदयात्रा आणि कोपरा सभांना नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. विशेषतः जाधववाडी आणि मोशी येथील महिला आणि युवकांनी विशाल आहेर यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. आमच्या हाकेला धावून येणारा माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून, केवळ निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता गेली अनेक वर्षे ते समाजकार्यात सक्रिय आहेत, ही बाब त्यांच्यासाठी अधिक फायद्याची ठरत आहे. या संपूर्ण निवडणुकीचे आणि प्रचाराचे नियोजन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जात असून, माजी नगरसेवक वसंत बोराटे हे स्वतः या पॅनलमध्ये असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा प्रचारात होत आहे. बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आलेले नियोजनबद्ध कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे विशाल आहेर यांची मोर्चेबांधणी अत्यंत मजबूत झाली आहे. विरोधकांकडे सत्तेचा अनुभव असला, तरी आहेर यांच्याकडे असलेल्या जनशक्तीच्या जोरावर प्रभाग २ मध्ये यावेळी मोठे परिवर्तन होणार, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.