प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – “चला…अंतरीचा कृष्ण जागवूया… आपण सारे एकत्र येऊन कृष्णमय होऊया !” आशा भक्तिमय वातावरणात वाकड येथे विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या तथा कथाकार जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून तीन दिवसीय ” श्री कृष्णलीला मायरा कथा ” सोहळा उद्या सोमवार (दि . २४) पासून सुरू होत आहे.भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराचे उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हा भक्तिरसाचा अविस्मरणीय सोहळा सलग तीन दिवस वाकडमध्ये साकार होणार आहे. शहरात एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणावर होणाऱ्या सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे तीन दिवस सलग श्रीकृष्णलीलेची मायरा कथा, जया किशोरी यांच्या मधुर वाणीतून थेट श्रवणाचा योग तमाम पिंपरी चिंचवड व वाकड मधील भाविकांना भक्तिरसात न्हाऊन निघण्याची संधी मिळणार आहे .२४, २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी दररोज सायंकाळी सहा वाजता मुंबई-बंगळूरू हायवेला वाकड येथील टीपटॉप हॉटेल जवळील मैदानात येथे हा कथा सोहळा रंगणार आहे. या भक्तिमय सोहळ्यासाठी महिला पुरुष आबालवृद्ध या सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. जया किशोरी यांना ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी वाकड, ताथवडे व पुनावळेतील भागातील हजारों भक्तांकरिता ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ” शहरात अनेकजण विविध उपक्रम व स्पर्धा घेत असतात. परंतु एक ऐतिहासिक व अध्यात्मिक सोहळा सहकुटुंब व मित्रमंडळींसह अनुभवता यावा म्हणून हा उपक्रम आयोजित केला आहे. सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहून आपल्या अंतरीचा कृष्ण जागवावा, ज्यामुळे परिसरातील संपूर्ण वातावरण कृष्णमय होईल .ही यामागची भूमिका आहे .” – राम वाकडकर ( आयोजक )