प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून दोन भावांवर रबर कापण्याच्या चाकूने हल्ला करून गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवारी (दि. ३१ डिसेंबर) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास धानोरे येथील सचिन इंजिनिअरिंग कंपनीजवळील परिसरात घडली. संतोषकुमार श्रीमेकुलाल (रा. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुल कामताप्रसाद कुमार (वय १८ वर्षे, रा. उत्तर प्रदेश – सध्या धानोरे, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. १) याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास धानोरे येथील सचिन इंजिनिअरिंग कंपनीजवळील परिसरात आरोपी संतोषकुमार याने जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी राहुल कमार आणि त्याच्या मोठ्या भावावर चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपीला अटक घेण्यात आली आहे.