प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जल्लनिसारण विभागाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयानुसार जलनिस्सारण वाहिन्या (ड्रेनेज लाईन) दुरुस्त व देखभाल करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये ठराविक ठेकेदाराला डोळ्यासमोर ठेवून अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. तसेच काही ठेकेदारांनी सर्वात कमी दर दिल्याने कामाच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित केली जात आहे. तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी स्थापत्य विभागाच्या कामांमध्ये कमी दर दिलेल्या ठेकेदारांच्या कामाची गुणवत्ता तपाण्याचे आदेश दिले होते. त्याची दक्षता व गुणनियंत्रण पथक व सीईओपीच्या पथकाने तपासणी केली असता अनेक कामांमध्ये गुणवत्ता खालावली असल्याचे निदर्शनास आले होते. निविदा दरापेक्षा खूपच कमी दर दिल्याने हे काम ठेकेदाराला कसे परवडते असा प्रश्न उपस्थित झाल्याने या कामांची चौकशी करण्यात आली होती. त्याचा अहवाल देखील तयार करण्यात आला होता. मात्र, दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर काहीच कारवाई करण्यात आली. त्यामुळे निर्ढावलेल्या प्रशासनाने पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवण्यास सुरूवात केली असल्याचे उदाहण महापलिकेच्या जलनिस्सारण विभागातून समोर आले आहे. कसे आहेत दर अ क्षेत्रीय कार्यालयासाठी कम अवेडिया इन्व्हारयो या संस्थेने २८.९९ टक्के कमी ८१ लाख ७८ हजार ९२१ रुपये दर दिला आहे. तर ब क्षेत्रीय कार्यालयासाठी विशाल सिव्हील या संस्थेने २४.१० टक्के कमी दराने ९० लाख २८ हजार २७७ इतका कमी दर दिला आहे. क साठी कम अवेडिया या कंपनीने १९.९९ टक्के कमी दराने ९१ लाख ९५ हजार ४१५ दर दिला आहे. तर फ साठी विशाल सिव्हील या संस्थेने २४ .१० टक्के कमा दराने ९० लाख २८ हजार २७७ इतका कमी दर दिला आहे. ठेकेदारांना अनुकूल अटी-शर्ती काही ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून या निविदा प्रक्रियेमध्ये अटी-शर्ती टाकण्यात आल्या आहेत. त्यामध्ये थ्री-इन-वन नावाचे मशिन फक्त अमेडिया याच कंपनीकडे असून ही कंपनी त्या वाहनाची निर्मिती करते. हे मशिन असावे असा उल्लेख असल्याने बाकीचे ठेकेदार अपात्र ठरले आहेत. ठराविक ठेकेदारांसाठी निविदा काढली असल्याचा आरोप होत आहे.