प्रभात वृत्तसेवा पिंपरी – स्वच्छ व सुंदर पिंपरीसाठी प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवानी यांनी केले. पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम यांच्या प्रचारार्थ पिंपरी कॅम्पातील सी ब्लॉक, शनी मंदिर, वैष्णव देवी परिसर या भागात प्रचार फेरी काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांसोबत पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, श्रीरंग शिंदे, मीना नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे, कल्पना घाडगे, ज्योती साठे, अनिता मोईकर, सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, शेखर अहिरराव, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव, प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी, रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज, सुरेश परदेशी, अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते.यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी सन २०१७ मध्ये महापालिकेवर निवड झाल्यापासून केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. मिलिटरी डेअरी फार्म येथे करण्यात आलेले सहा हजार वृक्षांचे रोपण, डेअरी फार्म उड्डाणपुलाचा मार्गी लावलेला प्रश्न, पवना सुधारसाठी केलेली धडपड, पूर्णत्वास नेलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचे नूतनीकरण, पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे रुंदीकरण, कोरोना काळात जिजामाता रुग्णालयासाठी दिलेली वैद्यकीय उपकरणांची मदत याचा उल्लेख त्यांनी केला.