प्रभात वृत्तसेवा पिंपरी – समाजवादी पार्टीने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष बी डी यादव यांनी पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये११ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १० मधून ॲड. सुनील माने, १९ मधून मारुती शिवशरण, २० ॲड.सहदेव वाळके, २० मधून सर्वसाधारण महिला सुप्रिया मौर्य, प्रभाग क्रमांक २२ मधून बी डी यादव, सर्वसाधारण महिला म्हणून मंजू यादव, २१ कमलेशकुमार यादव, २३ कुसुम गायकवाड, सर्वसाधारण पुरुष रऊफ शेख आणि प्रभाग २ मधून गनौर सहानी अशा ११ जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी बी डी यादव म्हणाले, प्रभागांमध्ये राखीव जागांवर जास्तीजास्त उमेदवार देण्याचा विचार आहे. शहरातील समस्यांची जाण तसेच सुशिक्षित उमेदवारांना प्राधान्य देण्यात येत आहे. पक्षाच्या वतीने संपूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्यात येणार आहे. —