प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण ३२ प्रभागांसाठी प्रत्येक ४ निवडणूक प्रभागांमागे १ याप्रमाणे एकूण ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाअंतर्गत स्ट्राँग रूम व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शहरात आठ ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानापूर्वी मतदान साहित्याचे वाटप तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम व संबंधित साहित्याची स्वीकृती करण्यात येणार आहे. त्यानंतर १६ जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी आठ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व आवश्यक तयारी करण्यात आलेली असून नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र प्रभाग – मतमोजणी केंद्र १०, १४, १५, १९ – स्थानिक संस्था कर कार्यालय, हेडगेवार भवन, निगडी प्राधिकरण १६, १७, १८, २२ – ऑटो क्लस्टर सभागृह येथील छोटा हॉल, चिंचवड. २, ६, ८, ९ – संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर भोसरी. २५, २६, २८, २९ – ड क्षेत्रीय कार्यालय, औंध–रावेत बीआरटी रोड, रहाटणी ३, ४, ५, ७ – कबड्डी प्रशिक्षण संकुलच्या तळ मजल्यावर स्ट्राँग रूम व पहिल्या मजल्यावर मतमोजणी अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी. १, ११, १२, १३ – घरकुल चिखली टाऊन हॉल, सेक्टर क्र. १७ व १९ दरम्यान, स्पाईन रोड शेजारी, चिखली. २१, २३, २४, २७ – स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव. २०, ३०, ३१, ३२ – महापालिका कासारवाडी भाजी मंडई (दुमजली हॉल)