पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुचर्चित निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. १५) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजल्यापासून शहरातील सर्व प्रभागांमध्ये मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली होती. दिवसभरात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी दुपारनंतरही मतदान केंद्रांवर रांगा दिसून आल्या. दरम्यान, आज (दि. १६) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. शहरातील आठ ठिकाणी मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी दहा वाजता मतमोजणीचे काम अधिकृतपणे सुरू झाले. मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षेची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निकालाकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत. सद्यस्थिती पुढीलप्रमाणे – एकूण जागा – 128 भाजप – 86 शिवसेना – 06 राष्ट्रवादी (अजित पवार) – 35 काँग्रेस – 00 शिवसेना (उद्धव ठाकरे) – 00 राष्ट्रवादी (शरद पवार) – 00 महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 00 इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) – 01