प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्व.ित्रक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस शहराच्या आजवरच्या राजकीय इतिहासातील सर्वाधिक गोंधळाचा ठरला. गेल्या सात -आठ वर्षांपासून प्रभागात काम करत असलेल्या आणि आजवर निवडणूक लढवायची म्हणून प्रचंड खर्च करणाऱ्या प्रस्थापितांना देखील पक्षांनी जोर का झटका दिला. अखेरच्या दिवसापर्यंत झुलवत ठेवले आणि अखेर एबी फाॅर्म दुसऱ्याच कुणाला तरी दिल्याने आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आल्याचे अनेकांना कळले. शहरात अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उत्साहाएवजी निराशेचे वातावरण ठिकठिकाणी पहावयास मिळाले.वरिष्ठांकडून करा तयारी असे आश्वासन मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून अनेक इच्छुक आपपल्या प्रभागात पायाला भिंगरी लावून फिरत होते. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्री, दिवाळी अशा सणांमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला होता. गौरी-गणपती सजावट स्पर्धा, नवरात्रीत गरबा-दा.ंडिया स्पर्धा, दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धा अशा स्पर्धा आयोजित करुन लाखो रुपयांची मोठ-मोठी बक्षीसे वाटली. घरोघरी पणत्या, उटणे, मिठाईसह दिवाळीच्या शुभेच्छा पोहचविल्या. नववर्षांचे हजारो कॅलेंडर छापून वाटले. अनेक दिवस कार्यकत्र्यांच्या मोठ्या समूहाचा खर्च उचलला. पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत तिकीट मिळणार की नाही ? ते कळूही दिले नाही. आश्वासन देणाऱ्यांचे फोन बंद होते किंवा ते उचलत नव्हते. उचलले तरी पीए साहेब मीटींगमध्ये असल्याचे सांगत होते. इतक्या दिवसांची दगदग, खर्च या सर्वांचा अंत निराशेने झाला. यात काही माजी नगरसेवक, बडे पदाधिकारी यांचा देखील समावेश आहे. जे आपल्या प्रभागात पक्षाचा चेहरा म्हणून वावरत होते, त्यांच्याच विरोधकांना पक्षात आणून तिकीट देण्यात आले. सोशल मीडियावर कार्यकत्र्यांचा रोष ज्या नेत्यासाठी दारो-दार फिरले, पक्षाचा झेंडा गल्ली-बोळात पोहचवला त्याच नेत्याला पक्षाने नाकारल्याने कार्यकत्र्यांमध्ये देखील रोष पहावयास मिळत आहे. शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला. आपल्या नेत्याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आमचे नगरसेवक तुम्हीच असा संदेश दिला. तर काहींनी आम्हाला हरवता येत नाही म्हणून… अशा पोस्ट्स टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या. विचारमंथन सुरू तिकीट मिळेल की नाही? याबाबत धाकधूक असल्याने अनेकांनी पक्षासोबत अपक्ष म्हणून देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रचारात जुंपलेल्या कार्यकत्र्यांनी मंगळवारी मात्र प्रचार थांबविला. रात्री उशिरापर्यंत नेत्यांच्या कार्यालयात किंवा कार्यकत्र्याच्या निवासस्थानी बैठका सुरू होत्या. अपक्ष लढायचे की मागे हटायचे? कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की फक्त हरविण्याचे लक्ष्य बाळागयाचे? अशा विषयांवर विचार मंथन सुरू होते.