प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार चेतन पवार व सागर ओव्हाळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाकड येथे उत्साहात झाला. या प्रसंगी जेसीबीवरून पुष्पवर्षाव करून उमेदवारांचे भव्य स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करत प्रचार मोहीमेची जोरदार सुरुवात करण्यात आली. यावेळी बदल हवा तर चेहरा नवा अशा घोषणा देण्यात आल्या. वाकड येथील म्हातोबा मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यानंतर उत्कर्ष चौक, दत्त मंदिर चौक, माऊली चौक, यमुना नगर कॉलनी, सद्गुरु कॉलनी, आदर्श कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, प्रभात कॉलनी परिसरात घराघरांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी विनोदे, रामदास पवार, अविनाश पवार, संजय पवार, पांडुरंग शिंदे, किसन गराडे, शांताराम सपकाळ, राकेश पवार, बाळासाहेब पवार, किसन पवार, धनंजय पवार, विजय दगडे, रोहन वाघेरे, सुमित निकाळजे, गणेश विनोदे, संतोष कदम, बाळासाहेब ओव्हाळ, कमलेश ओव्हाळ, विनोद ओव्हाळ, राहुल पवार, राजू पवार, संतोष कदम, स्वप्नील पवार, कृष्णा पवार, संतोष पवार, अरुण पवार, अक्षय भोसले यांच्यासह वाकड, ताथवडे, पुनावळे मधील असंख्य युवक व कार्यकर्ते यावेळी सहभागी होते.