प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक १५ मधील प्राधिकरण-सेक्टर २६ परिसरात गुरुवारी (दि. ९) सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या भव्य प्रचार फेरीमुळे परिसरात मित्रमंडळींचा मेळाच भरल्याचे वातावरण तयार झाले होते. भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजा मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे हे आपलेच आप्तेष्ट आहेत या भावनेने त्यांचे घरोघरी स्वागत झाले. पुढे, रहिवासी उमदेवारांसोबत प्रचारफेरीतही सहभागी झाले.माजी महापौर आर. एस. कुमार, भारतीय जनता पक्षाचचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मोरे, सलीम शिकलगार यांच्या प्रचारदौऱ्यातील सहभाग पक्षातील ज्येष्ठ आणि तरुणांचा समन्वय सांगून जात आहे. प्रभागातील असंख्य या सहकाऱ्यांच्या सहभागाने प्रचारदौरा अधिक दमदार झाला.