प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग १५ मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार शैलजा मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे यांनी प्रभागात फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या सोबत माजी महापौर आर. एस. कुमार, माजी नगरसेविका वृषाली मोरे, सलीम भाई शिकलगार, नरेंद्र येरकर, सुहास करडे, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, राजू कुलकर्णी, कौस्तुभ घोडके, रितेश बंडगर, विजय शिनकर, खेमराज काळे आदी मान्यवर उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळी गंगानगरमधील मार्बल गणपती मंदिर परिसरात सायंकाळी ५.३० वाजता भाजपच्या अधिकृत पॅनेलचा प्रचार सुरू झाला आणि वातावरण अक्षरशः तापले. ढोल-ताशांचा कडकडाट, घोषणांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता प्रभाग १५ मध्ये भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा वाढत असल्याचे समोर आले. भाजपचे अधिकृत उमेदवार शैलजा मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे हे चौघेही आत्मविश्वासाच्या चिलखतात सज्ज होऊन मैदानात उतरले होते. ते मतदारांशी संवाद साधत होते. त्यांच्या संवादाला मतदार देखील प्रतिसाद देत होते.