प्रभात वृत्तसेवा वाकड – निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आल्याने प्रभाग २६ मधील भाजपचे उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे, संदीप कस्पटे या उमेदवारांनी रविवारच्या सुट्टीचा दिवस गाठत अक्षरशः प्रभाग पिंजून काढला भाजपच्या उमेदवारांनी मतदारांसमोर प्रभागाच्या विकासाचा रोडमॅप सादर केला.हाऊसिंग सोसायट्यांमध्ये बैठका घेत मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या. जनतेचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता आमच्या पॅनलचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.यावेळी कार्यकर्त्यांनी मतदान यंत्राद्वारे कशाप्रकारे मतदान करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवले आणि शंकाचे निरसन केले. उमेदवारांनी सादर केलेला विकासाचा रोडमॅप अतिक्रमणमुक्त पदपथ आणि रस्ते, प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी हरितकरण, स्वच्छता आणि सुशोभीकरणावर भर, मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा, काळेवाडी फाटा परिसरातील आरक्षण विकसित करून त्या ठिकाणी खेळाचे मैदान, उदयान, विरंगुळा केंद्राची उभारणी, सांस्कृतिक भावनाचे नियोजन, नदीसुधार प्रकल्प राबविण्यास प्राधान्य, मेट्रो प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न, नागरी सुरक्षिततेला प्राधान्य, वाहतूक आणि कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी, भाजी मंडई विकसित करणार