प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक १६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी (दि. ११) सकाळी भव्य आणि अभूतपूर्व दुचाकी व चारचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग १६ चे पॅनल प्रमुख मोरेश्वर भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. या रॅलीच्या नियोजनासाठी उमेदवार जयश्री भोंडवे, आशा भोंडवे तसेच श्रेया तरस–गायकवाड उपस्थित होत्या. यासह पोलीस पाटील दिवाण भोंडवे, अक्षय तरस, तानाजी भोंडवे, कुणाल भोंडवे, संदीप गोजगे, नवनाथ भोंडवे, निखिल भोंडवे, माऊली भोंडवे, प्रमोद भोंडवे, स्वप्नील भोंडवे, बबन फडके, राजेंद्र म्हस्के, रमेश शिंदे, मनोहर भोंडवे, भानुदास भोंडवे, बाबाजी भोंडवे, अतुल भोंडवे, आर्यन भोंडवे, नरेश भोंडवे, कोंडिबा भोंडवे, शिवाजी भोंडवे युवक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.रविवारी सकाळी ९.३० वाजता रॅली मोरेश्वर भोंडवे यांच्या निवासस्थानापासून सुरू होणार असून प्रभागात भ्रमण करत रावेत येथील निवृत्ती लॉन्स येथे समारोप होणार आहे.