प्रभात वृत्तसेवा पिंपरी – राजकारणात मी नवीन असले तरी मला कौटुंबिक राजकीय वारसा आहे. माझे आजोबा चंद्रकांत टिळेकर देहूचे सरपंच होते. तर सासरे रंगनाथशेठ कुदळे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक होते. मला संधी मिळाल्यास मी प्रभागाच्या विकासासाठी माझे योगदान देईन, असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका कुदळे यांनी केले. पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम यांनी प्रचार फेरी वैयक्तिक भेटीगाठी, घरोघरी संपर्क याद्वारे मतदारसंघ पिंजून काढला आहे. मतदारांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मारवाडी व मुस्लिम समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, श्रीरंग शिंदे, मीना नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे, कल्पना घाडगे, ज्योती साठे, अनिता मोईकर, सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव, प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी, रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज, सुरेश परदेशी, अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते.