प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड येथील विविध यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने आयोजित या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रचारात अधिक जोमाने उतरले आहेत.या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मनिषा आरसूळ (अ गट), भाऊसाहेब भोईर (ब गट), शोभाताई वाल्हेकर (क गट) आणि शेखर चिंचवडे (ड गट) निवडणूक रिंगणात आहेत. या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.ही जाहीर सभा सोमवार, १२ जानेवारी २०२६ रोजी सायं ५.३० वा जयवंत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मैदान, भोईरनगर, चिंचवड (पुणे) येथे पार पडणार आहे. या सभेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मार्गदर्शन करत विकास, पारदर्शक प्रशासन, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. विविध संघटनानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या जाहीर सभेस परिसरातील सर्व नागरिक, बंधू-भगिनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.