प्रभात वृत्तसेवा पिंपरी – प्रभाग क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार वसंत बोराटे आणि विशाल आहेर यांनी प्रचाराची सांगता केली. विकासाचा ठोस अजेंडा आणि भ्रष्टाचारापासून प्रभाग क्रमांक २ ला मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला. प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, रखडलेली विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरी सोयीसुविधांवर विशेष भर दिला. विकास कामांच्या अजेंड्यावर कोणतीही तडजोड होणार नाही असा स्पष्ट संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि पारदर्शक कारभार हीच आमची ओळख राहील. प्रभाग क्रमांक २ मध्ये विकास दिसला नाही, तर नागरिकांनी आम्हाला जाब विचारावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागरिकांकडून उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विकास आणि स्वच्छ राजकारणाच्या मुद्द्यांवर भर देत राष्ट्रवादीने प्रचाराचा शेवट केला.